भाजपा व्यापार आघाडी च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 100 वा मन की बात कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी

आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चा कार्यक्रमाचा आज सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाजपा व्यापार आघाडीच्या वतीने तयारी करण्यात आली होती.

आजच्या या 100 व्य मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदरणीय नरेंद्र मोदी यांनी देशांतील तमाम नागरिकांचे अभिनंदन केले व कार्यक्रमाला सुरुवात केली.

3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा आज 100 भाग संपन्न होत आहे. याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रमात मोदींजींनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम नसून माझ्यासाठी श्रद्धा, उपासना आणि उपवास आहे. लोक देवपूजेला जाताना प्रसादाचे ताट घेऊन येतात. भगवंताच्या रूपातील जनता जनार्दनच्या चरणी हे प्रसादाचे ताट आहे. माझ्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास झाला आहे. अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबरच एक देशवासी 40-40 वर्षांपासून निर्जन जमिनीवर झाडे लावत आहे. कोणीतरी 30 वर्षांपासून जलसंधारणासाठी विहीर बांधत आहे. कोणी गरीब मुलांना शिकवत आहे. कुणी गरिबांच्या उपचारात मदत करत आहे. यासोबतच देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

‘मन की बात’ हा कार्यक्रम नेहमीच आम्हा सर्वांना प्रेरणादायी असून यातून समाजहितासाठी प्रचंड ताकदीने कार्य करण्याची प्रेरणा मिळते. या कार्यक्रमाला अनेक आजी माजी पदाधिकारी,व्यापारी वर्ग उपस्थित होता.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, बाळासाहेब कुंभार, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, महिला मोर्चा च्या संगीता ताई नष्टे, माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, महेश परदेशी, उद्योजक राधेश्याम देवी, अक्षय परदेशी, संजय जमदाडे, प्रकाश क्षिरसागर यांच्या सह अनेक पदाधिकारी, व्यापारी वर्ग उपस्थित होता. उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, महिला भगिनी आणि व्यापाऱ्यांचे भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *