
शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी वैभव पोळ हीचे यश
करमाळा प्रातिनिधी
पुर्व माध्यमीक शिष्यवृत्ती परीक्षेत शेटफळ ता. करमाळा येथील जान्हवी वैभव पोळ हिने यश मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने मार्च 2023 मध्ये घेतलेल्या पुर्व माध्यमीक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शेटफळ ता. करमाळा येथील जान्हवी वैभव पोळ हीने उत्कृष्ट गुण मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.

सध्या ती जेऊर ता. करमाळा येथील भारत हायस्कूल येथे शिक्षण घेत असुन तिच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक दहीभाते सर, वर्ग शिक्षक शेलार सर सर्व शिक्षक तसेच यशवंत क्लासेसचे जयेश पवार, विष्णू शिंदे, ऋषीकेश घोगरे यांनी अभिनंदन केले आहे. जान्हवी ही शेटफळ येथील लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ यांची कन्या असुन तिच्या यशाबद्दल तिचे विविध क्षेत्रातील मंडळींकडून कौतुक होत असून तिचे अभिनंदन केले जात आहे.

