करमाळा प्रतिनिधी

रावगाव सबस्टेशन हे मी पाठपुरावा करुन आणलेले काम असल्याने सबस्टेशनचे लोकार्पण करत असताना प्रयत्न सफल झाल्याचे मानसिक समाधान असल्याचे प्रतिपादन आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले. रावगाव ता. करमाळा येथील कार्यकमात ते बोलत होते. आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून रावगाव ता. करमाळा येथे ३३/११ केव्हीए क्षमतेच्या उपवीज केंद्राची उभारणी पुर्ण होऊन आज प्रत्यक्षात यातुन शेतीपंपासाठी वीजपुरवठा सुरु झाला आहे. यावेळी

आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते कळ दाबुन वीद्युत प्रवाह सुरू करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर सावंत गटाचे नेते सुनील सावंत, आदिनाथ कारखान्याचे संचालक डॉ. हरीदास केवारे, संचालक राहुल सावंत, माजी सभापती अतुल पाटील, जि.प. सदस्य भाऊ गोडसे, संचालक राजाभाऊ कदम, संचालक रविकिरण फुके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, उपअभियंता कलावते, उपअभियंता भोईर, सरपंच संदीप शेळके, गोलर्धन करगळ, विलास बरडे, सुभाष पवार, विलास मुळे, हबीब मुलाणी, प्रशांत बरडे, दादा पवार, शहाजी शिंदे, संतोष वरपे, रामदास बाबर, भारत नाळे, विनोद

सोळंकर, मच्छिन्द्र जायभाय, गौतम वारे, नानासाहेब जाधव आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, माझ्या आमदार पदाच्या मागील टर्म मध्ये रावगाव सबस्टेशनसाठी आपण प्रस्ताव दाखल केला होता. २०१८ मध्ये या कामास आपण मंजुरी मिळवून दिली व जागा खरेदी पर्यंत काम प्रगतीपथावर नेले. आता केवळ उभारणी बाकी असताना आमदार पदाचा कालावधी संपला. पण यानंतर सन २०१९ ते २०२४ मध्ये हे काम हाणुन पाडण्याचे पाप तत्कालीन

आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. आज परत मी आमदार पदावर असताना फिर से एकदा पाठपुरावा करत हे काम पुर्ण करुन दाखवले व आज यातुन वीज पुरवठा सुरळीत चालू झाला आहे. भविष्यात या भागातील जमिन ओलिताखाली आणण्यासाठी आपण नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे काम तडीस नेण्यासाठी सर्व राजकीय ताकद पणाला लावणार असुन शेतकऱ्यांच्या पाठबळाची गरज आपल्याला असल्याचेही आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवले. प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले तर यावेळी राजाभाऊ कदम व सुनिल सावंत यांनीही विचार मांडले. सुत्रसंचालन सुर्यकांत पाटील यांनी केले तर विलास बरडे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *