
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 100 वा मन कि बात कार्यक्रम करमाळा तालुक्यांत विविध ठिकाणी साजरा
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी करमाळा तालुकाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रमाचे करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

मन की बात हा कार्यक्रम करमाळा तालुक्यातील 21 गावांमधून 400 ते 500 नागरिकांनी ऐकला आहे, मन की बात कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदीजी म्हणाले की, “मन की बात या कार्यक्रमाने मला अनेक आव्हानाचं उत्तर मिळवून दिलं आहे. त्यातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि जनभाव कोट्यावधी लोकांसह माझ्या भावविश्वाचा अतूट भाग बनला आहे.”

बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम, स्वच्छता आंदोलन, खादी प्रेम, निसर्गाची गोष्ट, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असे जे विषय ‘मन की बात’ कार्यक्रमात आले ते जन आंदोलन झाले.
या १०० व्या पर्वाबाबत हजारो पत्रे, संदेश पंतप्रधानांना आले आहेत. यात अत्यंत भावुक, अंतर्मुख करणारी देखील पत्रे आहेत. मात्र या कार्यक्रमाचे श्रेय आणि अभिनंदनाचे मानकरी ‘मन की बात’चे श्रोते आहेत असे देखील त्यांनी विनम्रपणे नमूद केले.
३ ऑक्टोबर २०१४ हा विजयादशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून या दिवशी हा प्रवास सुरू केला. ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या सकारात्मकतेचा अनोखा सण झाला आहे.

देशाच्या विकासाला एका नव्या उंचीवर नेणारा हा कार्यक्रम भारतच नव्हे तर जगभरात पंतप्रधानांची एक नवी ओळख बनला आहे. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी गणेश चिवटे म्हणाले की, आपल्या अत्यंत उद्बोधक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन ऊर्जादायी, कार्याची नवी दिशा देणारे आणि प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करणारे ठरले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भगवानगिरी गोसावी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजपा व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया, पत्रकार जयंत दळवी, मोहन शिंदे, डॉ. अभिजीत मुरूमकर, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, विजयकुमार नागवडे, नितीन झिंझाडे, प्रवीण बिनवडे, धर्मराज नाळे, सोमनाथ घाडगे, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, दादासाहेब गाडे, हर्षद गाडे, दत्तात्रय पोटे, सागर नागटिळक, गणेश तळेकर, किरण शिंदे, शरद कोकीळ, वसीम सय्यद, भैय्या कुंभार, जयंत काळे पाटील, मनोज मुसळे, शिवाजी कुंभार, विनोद इंदलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.