
करमाळा प्रतिनिधी
महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, करमाळाने इ. 10 वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले केले असून विद्यालयाचा निकाल 89.11% लागला आहे. करमाळा तालुक्यात प्रथम तीन आलेले विद्यार्थी हे महात्मा गांधी विद्यालयाचे आहेत.
या वर्षी इ. 10 वी बोर्ड परीक्षेस एकूण 294 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी
अभिषेक अविनाश कोकाटे 97.80 % गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांक, ज्ञानदा अमोल रणशूर 97.40 % गुणांसह तालुक्यात द्वितीय क्रमांक, अनन्या महादेव ढवळशंख 97.20 % गुणांसह तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांचे मनःपूर्वक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, तसेच प्राचार्य बी. के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक एम. आर. कांबळे, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही. एल. पवार, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

