बीएसएनएलचे रेंज असूनही फोन येत नाहीत, ईंटरनेटची सेवाही विस्कळीत असते

करमाळा प्रतिनिधी

गेले कित्येक दिवस बीएसएनएल चे रेंज असूनही फोन येत नाहीत-जात नाहीत, ईंटरनेटची सेवाही विस्कळीत असते. सेवा विस्कळीत असल्याने ऑनलाईन व्यवहार करता येत नाहीत. रिचार्ज करताना मात्र भरपुर रकमांचे वेगवेगळे पर्याय ठेऊन कंपनी पैसे जनतेकडून ऊकळीत आहे. ईतर कंपन्याचे पर्याय ऊपलब्ध असल्याने जनताही सोईची सेवा निवडून काम भागवित

आहे. म्हणजे दूखण्यावर ईंजेक्शन कुणीच करत नाही. तालूक्यातील पत्रकाराकडून व लोकप्रतिनीधीकडून तरी  याला वाचा फोडता येईल का ? अन्यथा ते एक्सचेंजच बंद करावे अशी तरी कार्यवाही करावी लागावी असे काहीतरी करावे. कशाला सरकारी नाटक पाहिजे. आजच मी तक्रार घेऊन एक्सचेंज मध्ये गेलो होतो. पण तक्रार केली तरी काहीही निष्कर्ष निघत नाही.

तूमच्याच फोन मध्ये बिघाड आहे. घर किल्ल्यात आहे म्हणून अडचणी येतात अशाच काहीही तोंडच्या वल्गना करून तोंडाला पाने पूसून पाठवून दिले. तेथे जो मोटा नावाचा जो अभियंता कामाला आहे. तो काहीही दखल घेत नाही.  याचा मला पाच सहावर्षापासूनचा अनूभव आहे. ऊलट कूणाचीच तक्रार आली नाही तूम्हीच पहिल्यांदा आला आहांत असे म्हणाला. जर

अडचणी सोडवल्या जात नसतील तर कोण त्याच्याकडे वेळ खर्ची टाकेल किंवा ऐकून घ्यायला जाईल. यावर दैनिकातून, सर्व साप्ताहिकातून बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती. खरे तर गावातून बर्‍याच लोकांची बीएसएनएल च्या सेवेबाबत अनेक तक्रारी ऐकायला व अनूभवायला मिळाल्या. गेल्या पंधरा दिवसापासून तर काॅल न येणे, काॅल न लागणे, ईंटरनेट बंद पडणे, या अडचणींनी कळस गाठलाय. पण याबद्दल कुठेही आवाज न ऊठल्याने परिस्थिती काहीही बदलत नाही. तालूक्याच्या सर्व आजी माजी नेते मंडळीनी व पत्रकारांनी यात लक्ष घालून जनतेला होणार्‍या त्रासातून सुटका करावी अशी मागणी कलडोण यांनी कली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *