करमाळा भाजपाची तिसरी बुथ सशक्तीकरण आढावा बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका बुथ सशक्तीकरणची तिसरी बैठक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी लॉन्स मंगल कार्यालय पोथरे येथे संपन्न झाली.  या बैठकीचे आयोजन भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, अभिजीत निंबाळकर, लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेतला, तर संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी बुध सशक्त करण्यासाठी कशाप्रकारे काम करावे यावर मार्गदर्शन केले.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शासनाच्या योजना कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील व बुथ सक्षम करण्यासाठी बुथ प्रमुखांनी काम करावे असे सांगितले.

या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, शहर अध्यक्ष जगदीश

अगरवाल,अमरजित साळुंखे, भाजपचे सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर, प्रवीण बिनवडे, उपसरपंच अमोल पवार, मच्छिंद्र हाके, नितीन निकम, बिभीषण गव्हाणे, सोमनाथ घाडगे, किरण शिंदे, मोहन शिंदे, बाळासाहेब होसिंग, नितीन झिंझाडे, संदिपान कानगुडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष राजश्री खाडे, शहर अध्यक्षा संगीता नष्टे, नानासाहेब अनारसे, विनोद महानवर, धर्मराज नाळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  बैठकीचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार बिटरगावचे सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर यांनी मानले,.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *