
ज्योती मुथा या बॅगलेस ऑफ इंडिया या संस्थेमधून ऑफलाइन दोन दिवसाचे सक्सेसफुली वर्कशॉप करून आलेल्या आहेत
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील नावाजलेली व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चांक मिळवणारी मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांनी करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवीन प्लॅटफॉर्म देण्यासाठी 10 व 11 एप्रिल ला अजमेर बॅगलेस ऑफ इंडिया या संस्थेमधून वर्ल्ड रेकॉर्ड मेमरी किंग नवीन अग्रवाल यांच्याकडून ऑफलाइन दोन दिवसाचे सक्सेसफुली वर्कशॉप करून आलेल्या आहेत. या वर्कशॉप साठी इतर राज्यातून व देशातून विविध क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते.

याचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना निमोनिक सायन्सच्या आधारे आपल्या पाठ्यपुस्तकांमधील जगाचे भारताचे नकाशे, अत्यंत किचकट उत्तरे किंवा मोठी मोठी लक्षात न राहणारी उत्तरे, इतिहास भूगोलामधील तारखा, गणितामधील फॉर्मुले, सायन्स मधील केमिकल सूत्रे, पीरियाडिक टेबल तसेच शाळा कॉलेजमधील प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे ही सर्व निमोनिक साईच्या आधारे आपण आपल्या ब्रेनमध्ये कसे सेव करायचे व पाहिजे त्यावेळेस कसे रिकॉल करायचे याचे टेक्निक व नॉलेज त्यांना मिळाले आहे.

त्यांना मेमरी किंग नवीन अग्रवाल नरेंद्र सर, प्रीती मॅडम, मोनिका मॅडम या सर्वांचे मौलिक मार्गदर्शन लाभले व बॅगलेस ऑफ इंडिया या संस्थेने त्यांना लाईफ टाईम अनलिमिटेड सर्विस देण्याचे ही मान्य केले व त्यांचा तिथे बहुमान करून सत्कार करण्यात आला.
