मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले

करमाळा प्रतिनिधी

तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 27-4-2023 वार – गुरुवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ. गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून बांधकाम

व्यावसायिक बाळासाहेब घाडगे – पाटील, भाजप चे जिल्ह्याचे नेते विठ्ठलरावजी भणग, उद्योजक मुन्नाशेठ शिगची, नाना राजोपाध्ये, शिगची काकींजी, अमृताताई राजोपाध्ये, राष्ट्रवादी चे अरुणजी टांगडे यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते. यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत 4070 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला

बायपास चौक, देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले. या प्रसंगी बोलताना अमृता ताई राजोपाध्ये यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. नेर्ले येथील महेश पाटील यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे. ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले. तसेच दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण टांगडे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना

त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले. आजच्या शिबिरात 47 जणांची तपासणी करण्यात आली असून  21 रुग्ण ऑपरेशन साठी बुद्रानी हॉस्पिटल पुणे येथे रवाना झाले. या शिबिरासाठी जमील काझी, गुलाम गोस, पृथ्वीराज केंगार, विजय बारीदे, दिनेश मुथा, केतन संचेती, गणेश बोरा, वर्धमान खाटेर, अनंत मसलेकर, गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, प्रीतम राठोड, संतोष भांड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *