जेऊर येथे संभाजी ब्रिगेड  कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती

जेऊर प्रतिनिधी

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला संत परंपरेचा थोर वारसा लाभला आहे. त्यांचा सामाजिक समतेवर विश्वास होता. त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव उन्नती हक्क जातिभेद सामुदायिक विवाह समाजात अस्पृश्यता प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य सर्वांगीण विकास क्षेत्रात उन्नती यांचा अंगीकार केला होता. त्यांचा बालविवाहास विरोध होता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली देवाला यापेक्षा देहालयाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारे संत म्हणून महात्मा बसवेश्वराकडे पाहिले जाते. बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगलेश्वर बागेवाडी या गावी ११०५ मध्ये झाला. मध्ययुगातील भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वरांची ओळख अवघ्या देशाला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे अहंकाराचा नाश करणे ही त्यांची प्रतिज्ञा होती बसवेश्वर हे गरिबांचे कैवारी होते आपली संपत्ती लोकसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरवले होते समता हे तत्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र होते. आपण जे कमवतो त्यात ईश्वराचा वाटा आहे. म्हणून त्यातील दिन दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला होता. असे ते म्हणाले यावेळी उपस्थित. मुक्ता म्हमाणे वर्षा म्हमाणे सारिका म्हमाणे आराध्या म्हमाणे निलावती म्हमाणे तनुजा म्हमाणे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके निलेश पाटिल ,  विश्वनाथ सुरवसे अतुल निर्मळ विलास झाडे,  बाळासाहेब कर्चे धन्यकुमार गारुडी बालाजी गावडे राकेश पाटील महेश साळी पिंटू जाधव अजित पवार  अभिजीत म्हमाणे रणजीत कांबळे   आजिनाथ माने शिव म्हमाणे दिगंबर म्हमाणे संतोष वेदपाठक  राजवीर म्हमाणे शिवम झाडे शुभम म्हमाणे स्वप्निल म्हमाणे ओम म्हमाणे इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *