करमाळा प्रतिनिधी

डॉ एस .टी .शाह यांचे दुःखद निधन : भावपूर्ण श्रद्धांजली : डॉ एस टी शाह यांचे दुःखद निधनामुळे कुटुंबातील कर्ता माणुस गमावल्याची भावना : माजी आमदार जयवंतराव जगताप : – करमाळा शहरातील सुप्रसिद्ध व नामांकित डॉक्टर एस टी शाह ( वय ८७ ) यांचे पहाटे अल्प आजाराने दुःखद निधन झाले . सोलापूर जिल्ह्यात सरकारी डॉक्टरी सेवेच्या निमित्ताने आलेले डॉ एस टी शाह तत्कालीन नेते कै .नामदेवराव जगताप यांचे सूचनेनुसार व सहकार्याने करमाळा येथे आले व वैद्यकीय सेवा सुरु केली . आपल्या वैद्यकीय सेवेतून ते करमाळा करांच्या गळ्यातील ताईत बनले होते . त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे . जयवंतराव जगताप ( माजी आमदार , करमाळा ) : – डॉ एस .टी .शाह यांच्या निधनाचे वृत्त समजले व अतीव दुःख झाले परंतु ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही . शाह साहेबांच्या जाण्यामुळे व्यक्तिश : मी माझ्या कुटुंबातील कर्त्या माणसाला गमाविले आहे . परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो , मी शाह कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *