
करमाळा प्रतिनिधी
आज ९ जुलै रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस व स्व.मदनदास देवी यांची 84 वी जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम मदनदास देवी आय टी आय कॉलेज येथे संपन्न झाला. आज सकाळी सर्वप्रथम भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्व. मदनदास देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. श्रीराम परदेशी, राधेश्याम देवी, संतोष कांबळे, गोपाल वाघमारे, इतर स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

