जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने भगवान महावीर जयंतीला पुष्पहार अर्पण

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने भगवान महावीर जयंतीला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. व शितपेय व पाणी बॉटलचे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले भगवान महावीरांचे अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मूल्यावर सकल जैन धर्मियांचे विचार मानव जातीला  दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक आहेत सुखी समाधानी जीवन ही प्रत्येकाची

आकांक्षा असते व त्यासाठी सुख साधनाची आवश्यकता असते परंतु केवळ साधने संपादित केल्याने सुख प्राप्त होत नाही यासाठी साधनांच्या बाबतीत सम्यक विचार महत्त्वाचा ठरतो. भगवान महावीरांचा दुसरा महत्त्वाचा विचार हा अत्यंत मुलगामी व अहिंसा सर्व स्तरावर स्वीकारण्यावर भर देतो असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पल्लवी शिंदे, राणी पाटील, प्रियंका खटके, मीनाक्षी पाटील, नितीन खटके,  बालाजी गावडे, राकेश पाटील, अतुल निर्मळ, सुहास पोळ, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, निलेश पाटील, आदिनाथ माने, सुहास शिंदे, रणजीत कांबळे, धन्यकुमार गारुडी, पप्पू कांडेकर, अभिजीत म्हमाणे, शिवप्रताप खटके, बाळासाहेब घाडगे, संदिपान माने, वैभव मोहिते इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *