करमाळा शहरातील नागरिकांना वेठीस धरणारा ठेकेदारावर कार्यवाही करावी

करमाळा प्रतिनिधी

            करमाळा नगरपरिषदेने शहर स्वछ व साफसफाई करण्याचा ठेका विनीत पांडुरंग देवरे वेस्टेक बायोन्हेन्वर ग्रुप ३ सुबल्सल अपार्टमेंट नागरमेळा हनुमान वाडी पंचवटी नाशीक या कंपनीस १२,४८,८२८/- रूपये प्रती महीना नगरपालिकेच्या अटी व शर्तीवर मंजुर करण्यात आला होता. परंतु सदर ठेकेदराने सर्व अटी शर्थी चा भंग केला असुन या बाबत ची योग्य ती चौकशी करून आरोग्य विभागातील शहर स्वच्छता साफ सफाई ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

             जिल्हाधिकारी सोलापुर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषदे कडे आरोग्य विभागातील साफसफाई करणारे ठेकेदारा विषयी माहीती मिळण्याकामी १४ सप्टेंबर २०२२ रोजी लेखी अर्ज़ दिला होता परंतु नगरपालिकेने त्याचे उत्तर दिले नाही पुढे माहीती मिळण्याकामी तीन स्मरण पत्रे दिली तरी पण माहीती न मिळाल्याने माहीती अधिकारात माहीती मिळण्याकामी अर्ज केला परंतु तीस दिवसात माहीती न दिल्यामुळे मुख्याधिकारी करमाळा यांच्या कडे अपील केले त्याची सुनावणी आठ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनात झाली असुन माहीती सात दिवसात देणे आवश्यक असताना सदर माहीती मिळण्याकामी पाच वेळा अर्ज द्यावा लागला आणी सोळा मार्च रोजी माहीती मिळाली. पहिला अर्ज केल्यापासुन तब्बल सहा महिन्यानी माहीती मिळाली.

        सदर मिळालेल्या माहीती मध्ये ठेकेदाराने स्वच्छता साफ सफाई चे बीलाची नोंद आवक रजिस्टर मध्ये दिसत नाही. सदर ठेकेदाराने बारा मार्च पासुन कोणतीही पुर्व सुचना न देता पंधरा दिवस काम बंद केले होते. सदर ठेकेदाराने नगरपालिकेस करार पत्रात नियम क्रमांक ३९ मध्ये सफाई चे काम अत्यावश्यक सेवेत येत असल्याने काम बंद करण्यात येणार नाही अश्या पध्दतीने लिहुन दिलेले आहे एवढ्या वर न थांबता मार्च २०२३ मध्ये दोन दिवस काम बंद ठेवले होते परंतु मुख्याधिकारी यांनी अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच माजी नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात

पंढरपुर येथील अंदाजे साठ कर्मचारी आणून दहा दिवस शहरातील गटारी सफाई करून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून दोन खाजगी ट्रॅक्टर ट्राॅली लावून कचरा गाळाची वाहतुक करुन साफसफाई केली परंतु याचेही बील ठेकेदाराला देण्यात आले सदरचे वाढदिवसानिमित्त केलेली साफसफाई चे फोटो करमाळा येथुन प्रसिद्ध होणारे साप्ताहिक मध्ये छापुन आलेले आहे. सदर ठेक्या मध्ये करमाळा नगरपरिषदेचे कायम कर्मचारी काम करताना दिसत आहे, सफाई कामगारांना कुठलीही सुविधा नाही हॅंडग्लोज, पायातील बुट, मास्क, आदी साहित्य पुरविण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. जंतु नाशक पावडर ची फवारणी केलेली दिसुन येत नाही तर फिनेल तर नगरपालिका खरेदी करत नसल्याचे समजते ठेकेदार कामगारांना ३०० ते ४०० रूपये रोज पगार देतो सुट्टी असली तर पगार दिला जात नाही.

      अशा अनेक बाबी समोर आले असुन शहरास अश्या वेठीस धरणारा ठेकेदारावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी जमादार यांनी जिल्हाधिकारी सोलापुर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *