बुलढाणा अर्बन परिवारातर्फे 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

बुलढाणा अर्बन परिवारातर्फे जागतिक महिला दिनाचे  औचित्य साधून शाखा करमाळा येथे मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पडला. संस्थेचे उद्दिष्ट नेहमीच महिला सक्षमीकरण व समाजातील सर्व घटकांच्या विकासाकडे असते. आजची महिलाही घर परिवार सांभाळून पुरुषांसोबत काम करताना दिसत आहे. बचत गट, कर्ज या माध्यमातून आपण आपली प्रगती कशी करू शकतो, याचे उत्तम मार्गदर्शन व कार्यक्रम दरम्यान योग्य माहिती महिलांना देण्यात आली. कार्यक्रमातून आपण समाजाचे

काही देणे लागत आहोत ही भावना निर्माण झाली. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे वरकटने गावाचे पोलीस पाटील सुनिता काळे यांनी मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित यशस्वी महिला उद्योजकांना प्रमाणपत्र वाटप करून सन्मानित  करण्यात आले. मोठ्या उत्सहाने पार पडलेल्या कार्यक्रमात महिला वर्गांची उपस्थिती प्रशंसनीय होती. बुलढाणा अर्बन ने केलेल्या उपक्रमाची प्रशंसा महिला वर्गामध्ये पाहायला मिळाली. या कार्यक्रमास बुलढाणा अर्बन चे मॅनेजमेंट प्राइवेट लिमिटेड चे शाखा व्यवस्थापक खुद्दुस शेख व शाखेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *