
8 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी, वीट यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
08/03/2023 रोजी जागतिक महिला दिन वीट येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊसाहेब माता रमाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार व दिप प्रज्वलन केले. या वेळी इंदूबाई कांबळे, मनिषा कांबळे, अक्षरा ढेरे, छकुली कांबळे, स्वरा कांबळे, अनुष्का कांबळे या महिला तर प्रेमचद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विकास कांबळे, सुनिल बापू धाकतोडे, अमोल धाकतोडे, रायचंद धाकतोडे, किशोर कांबळे, अमोल झेंडे, भैरवनाथ धाकतोडे, आकाश कांबळे, बालू धाकतोडे, गोरख गाडे अविनाश कांबळे, वंचित बहुजन आघाडी निरिक्षक मनोज कांबळे, मेहबूब शेख, आदी कार्यकर्ते व लहान मंडळी उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे सर यांनी जागतिक महिला दिना विषयी माहिती दिली. तालुका महा सचिव नंदू कांबळे सर यांनी प्रस्ताविक केले व आभार मानले व कार्यक्रम संपला.

