महिलांनी सक्षम राहुन भविष्यात कुर्डुवाडी शहराचे नेत्रुत्व करावे –  प्रा डॉ.राजेंद्र दास सर

 जागतिक महिला दिनाच्या निमित्त कुर्डुवाडी शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने कुर्डुवाडी शहरातील तब्बल 122 विविध क्षेत्रातील सक्षम स्व:कर्तुत्वावर संसाराचा गाडा चालवणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. राजेंद्र दास सर होते.  या वेळी महिला माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी बोलताना प्रा. डॉ राजेंद्र दास सर म्हणाले, शहरातील एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला जर एकञ येत असतील तर भविष्यात शहराचे नेत्रुत्व महिला करतील यात काहीच दुमत नाही.

  या प्रसंगी प्रथमतः सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमा ची सुरवात करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रमुख महिला मान्यवरांचा कुर्डूवाडी शहर महिला आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धनश्री ताई खटके, मायाताई माने, सविता बापूसाहेब जगताप, वैशाली चेतन शहा, मंदाकिनी हरी पाटील, सोनिया गुजरे मॅडम, माधुरी पाटील, वैष्णवी पाटील, निलोफर शेख, शितल लोंढे या महिला मान्यवर ऊपस्थीत होत्या. तर शहरातील विविध हॉस्पिटल मधील महीला डाॅक्टर, नर्स, पोस्ट ऑफिस मधील महिला कर्मचारी,  पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी,  तसेच ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महीला, शहरात विविध ठिकाणी मेडिकल व्यवसाय करणाऱ्या महिला, तसेच शहरातील शिक्षिका, लहान व्यवसाय करणाऱ्या महिला, भाजीविक्रेत्या, विणकाम करणाऱ्या महिला, मजुरी करणाऱ्या महिला,  बांगडी व्यवसाय करणाऱ्या महिला,  बचत गट सक्षमपणे चालवणाऱ्या महिला, इत्यादी विविध क्षेत्रातील महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल सर्व माता-भगिनींच्या हस्ते युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे,  पद्मजा दातार, स्वाती गोरे, मंजुश्री साठे, जयश्री कारंजकर, विद्या गोसावी, साक्षी गायकवाड, आरती गाडेकर, वासंती गवळी, अंजना कांबळे, आदी शहर महिला पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.

तसेच या प्रसंगी सुधीर भाऊ गाडेकर, बालाजी गायकवाड, शार्दुल दातार, कुमार बेंडाळे, लक्ष्मण कांबळे, ज्ञषिकेश क्षीरसागर, सुहास सरडे, सागर गोफ़ने, इ. उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *