
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त उद्या करमाळ्यात माहेर मेळाव्याच्या आयोजन…
प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील गाव पातळीवर मूलभूत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांचा सन्मान सोहळा उद्या दिनांक 10 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता विकी मंगल कार्यालय, बस स्टँड समोर, करमाळा या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे .

सदर माहेर मेळाव्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आरोग्य विभागाच्या अशा स्वयंसेविका, अशा गटप्रवर्तक यांना गणवेशाची साडी देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. कोविड कालावधीमध्ये गाव पातळीवर जनजागृती चे महत्त्वाचे काम केल्याबद्दल सदर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांचा हा सन्मान सोहळा प्रांताधिकारी ज्योतीताई कदम यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ.विशाल हिरे, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रद्धा भोंडवे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत उपस्थित राहणार आहेत.

