महाराष्ट्राच्या आजच्या अर्थसंकल्पावर सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी दिलेली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला व शेतकऱ्यांना सन्मान देणारा व  सक्षम करणारा अर्थसंकल्प आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन तसेच मागील त्याला शेततळे व शेती अवजारेचा लाभ पिक विम्याची रक्कम शासन भरणार धान पिकाला हेक्टरी पंधरा हजार रुपये अनुदान देणार यासारखे निर्णय शेतकऱ्याला सक्षम करणारे आहेत.

महिलांना एसटी 50% प्रवासी भाड्यात सवलत लेक लाडकी योजनेअंतर्गत स्त्रियांचा केलेला सन्मान अंगणवाडी का सेविका यांचे वाढवलेले मानधन श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना या माध्यमातून अनुदान वाढवून वयोवृद्धांना दिलेला मदतीचा हात या सर्व बाबी सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे.

बरोबर आरोग्याच्या संदर्भात महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत पाच लाखाचे उपचार आता मोफत होणार आहेत. शिवाय 700 आपला दवाखान्याच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या महागड्या तपासण्या व उपचार मोफत होणार आहेत. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तळागाळातील लोकांच्या भावना व संवेदना जाणणारे हे सरकार असून संकल्पच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी आपण सर्वसामान्य माणसांना मूळ प्रवाहात आणून त्यांना सक्षम करणार असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहेत.

या चा अर्थसंकल्पामुळे महाविकास आघाडीचे नेतेमंडळीच्या छातीत धडकी बसणार असून अशाच पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे येणारा पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात धुराळा असा विश्वास जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *