
पडसाळी (ता.माढा) येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात संपन्न……
मौजे पडसाळी (ता.माढा) येथे ग्रामपंचायत पडसाळीच्या वतीने महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक करताना पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी सरपंच झाल्यापासुन मागील ६ महिन्यात केलेल्या विकासाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला व सर्वांच्या साथीने असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पडसाळी गावचा विकास करताना गट-तट न बघता सर्वसमावेशक असं काम करून सर्वांगीण विकासातुन तालुक्यात नंबर एकला गाव कसं राहील यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरांच स्वागत केलं.

सकाळच्या सत्रातील विविध कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक वक्ते म्हणुन माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा निशिगंधाताई कोल्हे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा, माऊली शिक्षण समुहाच्या सचिव सुरजाताई बोबडे यांची उपस्थिती लाभली व त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष मिनलताई साठे म्हणाल्या मुलींना शिकवल पाहिजे, त्या शिकल्या तर दोन कुटुंब सुशिक्षित होतात. त्यांनी यावेळी महिलांना विनंती केली की मुलांबरोबर मुलींना चांगल शिक्षण देऊन मोठ्या अधिकारी बनवा. त्याच बरोबर शिक्षणाच महत्व समजवुन दिलं. पडसाळी गावात दारूबंदी आहे म्हणुन त्यांनी गावच कौतुक यावेळी केलं, त्याचबरोबर त्या म्हणाल्या पडसाळी गावच्या सरपंचांच काम खुप चांगल आणि सर्वसमावेशक सुरू आहे, त्यांनी भविष्यात असेच नवनवीन उपक्रम राबवून गावचा सर्वांगीण विकास साधावा.

डॅा. निशिगंधा कोल्हे यांनी आरोग्याविषयी खुप मोलाच मार्गदर्शन यावेळी केलं त्या म्हणाल्या, महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे ती सक्षम सुदृढ तर पुर्ण घर निरोगी राहतं. पडसाळी ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी लकी ड्रॅा योजना राबविल्याबद्दल सरपंच योगेश पाटील यांच अभिनंदन केलं व तालुक्यातील सर्व सरपंचांनी अनुकरण करावं असही यावेळी त्या म्हणाल्या.
जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे म्हणाल्या की महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी बचत गट तसेच ग्रामसंघ मजबूत झाले पाहिजेत त्याचबरोबर गृहउद्योग सुरू केले पाहिजेत. सरपंच योगेश पाटील यांनी महिलादिनामित्त जसा मोठा कार्यक्रम घेतला तसाच महिलांना गृहउद्योग मेळावा घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी कु. शुभ्रा प्रशांत मुटकुळे हिच्या रूपात सावित्री आवतरल्याचा भास सर्वांना झाला व तिच्या भाषणाने सर्व मान्यवर, महिला तसेच उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले तसेच स्टेजवर मान्यवरांनी तिचा सत्कार केला. पडसाळी गावातील मनीषा विलास मुटकुळे व पल्लवी दिनकर देशमुख यांनी खुप मोलाच व सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व उखाणे स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या.

त्यानंतर दुपारच्या सत्रात ग्रामपंचायत पडसाळी आयोजित भव्य लकी ड्रॅा सोडत व बक्षीस वितरणासाठी नायब तहसीलदार केसकर मॅडम, गट विकास अधिकारी दिपक चिलवंत साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॅा. थोरात साहेब, बांधकाम विभागाचे उपअभियंता हांडे साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव साहेब, पंचायत समिती कुर्डुवाडीचे बागल साहेब, विस्तार अधिकारी सुतार साहेब, विस्तार अधिकारी रेपाळ साहेब, मंडल अधिकारी शेळवणे साहेब, माढा नगरपंचायतीच्या नगरसेवक गितांजली देशमुख, क्रिसील फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली शहा, अग्रणी बॅंकेचे हनुमंत भालेराव साहेब, पशुधन विकास अधिकारी डॅा. सचिन मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी सुप्रिया शेळके, क्रिसील फाऊंडेशनचे अविनाश शिंदे, सोलंकरवाडीचे शहाजी यादव यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक रूपाली सुर्वे, तलाठी पुनम कांबळे, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी योगदान दिले.
यावेळी लकी ड्रॅा सोडतीत प्रथम क्रमांकच्या बक्षीसाच्या मानकरी म्हणुन शारदा हनुमंत देशमुख यांची निवड झाली. तर द्वितीय बक्षीस सविता संतोष वगरे यांना आणि तृतीय बक्षीस छाया सदाशिव जगदाळे यांना मिळाले. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे १२ गरजू महिलांना मिळाली.
यावेळी माजी सरपंच दत्ता नाना फरड, सचिन पाटील, चेअरमन दादासाहेब देशमुख, व्हा. चेअरमन तुकाराम सलगर, उपसरपंच रतन फरड, ग्रा.पं. सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, विमल सलगर, साधना देशमुख, महेश पाटील, दत्तात्रय देशमुख, प्रवीण पाटील, मोहन मुटकुळे, दीपक पाटील, भरत पाटील, निलेश शिंगाडे, विष्णु फरड, कल्याण फरड, सचिन मुटकुळे, शिवाजी पाटील, अजिंक्य पाटील, गणेश मुटकुळे, अक्षय पाटील, संदीप देशमुख उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत पडसाळीच्या वतीने करण्यात आणि कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्ञानेश्वर गायकवाड सर यांनी केले.
या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी व मान्यवरांचा सत्कार हार तुरे फेटे न देता केशर आंब्याच सुंदर असं रोपटं देऊन केला व उपस्थित सर्व महिलांना केशर आंब्याची ५०० रोपे देऊन व प-पाळीचा हे ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत उपयोगी असे पुस्तक देऊन सन्मानित करण्याच काम पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी केलं. यामुळे सर्वच स्तरातुन त्यांच कौतुक करण्यात आलं.