पांडे येथे महिला दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी

 8 मार्च महिला दिनानिमित्त पांडे येथे महिलांनी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम गावच्या ज्येष्ठ महिला छबुताई वीर, सीमाताई विटकर, सविता घोडगे मॅडम यांच्या हस्ते जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई या महामातांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात स्वागत गीत महामातांचे जीवनावर व महिला वरती भाषण कविता व गीते सादर करण्यात आले. त्यानंतर महिला व मुलींच्या नृत्य अविष्काराने

कार्यक्रमाला शोभा आली या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला वर्गाचे सहकार्य व उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवती करमाळा तालुका अध्यक्ष शितल क्षीरसागर, पांडे ग्रामपंचायत सदस्य योगिता, दुधे पांडे, सी आर पी सीमाताई कुंभार, ग्राम संघ लिपिका संगीता दुधे, अंगणवाडी सेविका अश्विनी दुधे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमासाठी सर्व साऊंड सिस्टिम लाईट व महिलांसाठी  नाष्ट्याची सोय यासाठी सामाजिक कार्यकर्ते संपत दिगंबर कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *