
इरा की झलक ———सबसे अलग
इरा पब्लिक स्कूल चिखलठाण चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
इरा पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी समाजसेवक, अध्यक्ष यशकल्यानी सेवा भावी संस्था मा.गणेशभाऊ करे पाटील , चंद्रकांत(काका)सरडे सरपंच

,राजाभाऊ बारकुंड मा.उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर,धुळाभाऊ कोकरे संचालक आदिनाथ कारखाना, दत्तात्रय सरडे मा. उपसभापती करमाळा, संदिपान कामटे सरपंच कुगाव, विकास गुंड सरपंच शेटफळ, गजेंद्र पोळ सकाळ वार्ताहर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनासाठी चिखलठाण व पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी अफाट गर्दी केली होती.
इरा च्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

श्री. कोटलिंग नाथबाबाच्या छबिण्याच्या सादरीकरणाने तर आसमंत उजळून निघाला. आजा कर ले गुनाह या भयपट नृत्याने तर अदभुत वाहवा मिळविली.
सर्व गाणी सादरीकरण होईपर्यंत प्रेक्षकांनी आपली जागा सोडली नाही. असा भव्यदिव्य कार्यक्रम पाहून सर्व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
असा मनमोहक व नयनरम्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व ड्राइवर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.
