बोरगाव विविध कार्यकारी सोसायटी

   बिनविरोध

करमाळा :- प्रतिनिधी

         बोरगाव,वाघाचीवाडी,दिलमेश्वर,पोटेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेची निवडणुक जिल्ह्याचे नेतेमाजी आमदार जयवंतराव जगताप,आमदार संजय मामा शिंदे ,दिग्विजय बागल,नारायणपाटिल,विजयराव चादगूडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्व भागाचे युवा नेते विनय काका ननवरे यांच्या नेतॄत्वाखाली बिनविरोध झाली असुन यामध्ये सर्व साधारण गटातुन पांडुरंग ननवरे,वेणु विष्णु मस्के,दुर्गा यादवराव घाड़गे,चंद्रकांत भोई,तानाजी ढवले,भाऊसाहेब गायकवाड,सुधीर भोगल,दत्तात्रय मस्के महीला राखीव मधुन शैला मछिद्र शिंदे,कावेरी पांडुरंग शिंदे ,मागासवर्गीय प्रतिनिधी अनिल खराडे एन, टी मधुन तुकाराम महानवर,इ.मा.मधुन किसन भोज यांची बिनविरोध निवड झाली आहे

बोरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी सौ,एस के मुंडे यांच्या कड़े एकुण तेरा अर्ज दाखल झाले होते त्तेरा जागेसाठी तेरा अर्ज राहील्याने सहाय्यक निबंधक दिपक तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी मुंडे यांनी आज बिनविरोध निवडीची घोषणा केली त्यांना बोरगाव सोसायटी चे सचीव राहुल निकमयांचे सहकार्य लाभले,ही निवडनुक पूर्व भागतिल राजकरानासाठी अत्यंत महत्वाची समजली जाते.

       ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी विनय ननवरे,प्रमोद गायकवाड,सुधीर भोगल,अजीत पाटिल,पप्पू ढवले ,संजय पाटील,जीवन पाटिल,लालमन भोइ आदी जणानी प्रयत्न केले

          यावेळी विनय ननवरे यानीं सर्वर् मतदार ,नेते , कार्यकर्ते यांचे आभार मानले तसेच् ही नीवडनुक बिनविरोध झाल्यायमुळे संस्थेचा खर्च वाचला त्यामुळे सर्व गटाचे प्रमुख व सभासदाचे आभार येणारे काळात सभासदाचा कुठलाही भेदभाव न करता कर्ज वाटप केले जाईल या संस्थेला उभारी देण्याकामी सर्व थकीत कर्जदारानी सहकार्य करावे व संस्था उभारणी साठी मदत करावी तसेच् निवडनुक बिनविरोध करताना कुणाच्या भावना दुःखवल्या अस्तील तर क्षमा आसावि ,सर्वाना न्याय देता येत नाही ज्याना या निवडनुक़ीत न्याय मिलाला नाही त्याना पूड़च्या नीवडनुक़ीत नक्की न्याय देउ…

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *