संत निरंकारी मंडळ करमाळाचे वतीने श्री क्षेत्र संगोबा येथे स्वच्छता अभियान करमाळा -सद्गुरू माता सुदीक्षांजी महाराज यांच्या असीम कृपेने निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात 27राज्यात स्वच्छ जल -स्वच्छ मन अमृत प्रकलपांतर्गत लोकोपयोगी नदी परिसराचे स्वच्छताभियान राबवण्यात आले.संत निरंकारी मंडळ ब्रँच करमाळाच्या वतीने श्री क्षेत्र संगोबा येथील नदीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नुकतीच तेथे महाशिवरात्रीदिवशी मोठी यात्रा संपन्न झाली होती. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात प्लास्टिकचा खूपमोठ्या प्रमाणात कचरा पडलेला होता. तो कचरा

वारा वादळाच्या साह्याने पाण्यात जाऊन नदीचे पाणी दूषित होऊन माणसाचे व इतर प्राण्याचे आरोग्य बिघडते.त्यामुळे संपूर्ण आदिनाथ महाराज मंदिराचा व नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला.सर्व कचरा जाळून नष्ट करण्यात आला. या अभियाना बद्दल मंदिर ट्रष्टीच्यावतीने सन्मान करण्यात आला.स्वच्छता अभियानात साधारण 150 पुरुष व स्त्रियां सहभागी झाल्या होत्या. स्वच्छता अभियान च्या उदघाटन प्रसंगी संगोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुनील शिंदे सर व सर्व शिक्षक तसेच कॉटेजचे डॉ. वाडेकर, मुकुंद साळुंखे सर, डॉ. भाऊसाहेब सरडे उपस्थित होते.स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी ब्रँचमुखी पोपट थोरात गुरुजी,सेवादल अधिकारी रमेश वारे व सर्व महिला पुरुष सेवादल समवेत सर्व साधसंगतनी योगदान दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *