स्नेहालय स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता
करमाळा प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन स्नेहालय स्कूल,कृष्णाजी नगर करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन डाँ हर्षवर्धन माळवदकर,डाँ वर्षा करंजकर यांनी केले होते अध्यक्षस्थानी स्कूलचे संस्थापक जयंत दळवी,
मुख्याध्यापिका धनश्री दळवी होत्या. यावेळी बोलताना डाँ माळवदकर म्हणाले की,विज्ञानाचे युग आहे युगा प्रमाणे स्कूल मध्ये आयोजन केले आहे हे कौतुकास्पद आहे.
डाँ करंजकर म्हणाल्या की,विज्ञानातील प्रयोग करून दाखवुन विद्यार्थ्यांनी सर्वांना विज्ञानी जादुचे दर्शन घडविले आहे.
मुख्याध्यापिका दळवी म्हणाल्या की,आधुनिक संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान यावे यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन,विज्ञान प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन स्नेहालय स्कूल मध्ये करण्यात येत आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले होते या कार्यक्रमाचे आयोजन सहशिक्षिका सीमा कोरडे,शिवांगी शिंदे, हेमा शिंदे,पल्लवी माळवे ,फरहान खान,शुभांगी खळदकर,कोमल बत्तीशे,अंजुम कांबळे,सविता पवार, रोहिणी गरड, बाबा तांबोळी,अंकुश नाळे ,कृष्णा पवार,राहुल पलंगे आदिंनी परिश्रम घेतले होते यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सीमा कोरडे यांनी केले तर आभार शुभांगी खळदकर यांनी मानले होते.