सोलापुर विद्यापिठात राजमाता अहिल्याबाई होळकर स्मारक समितीचे निवडीत जातियवाद, राजमाता अहिल्याबाईंना फक्त एका जातीत तोलु नका- ॲॅड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी
राजमाता अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापिठामधे स्मारक समिती नव्याने स्थापित केली असुन, या कार्यकारीणी मधे फक्त धनगर समाजालाच प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत त्यांचेबद्दल आक्षेप नाही मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या कमिटीत जसे सर्व जाती धर्माचे लोकांना कमिटीत स्थान दिले होते तसे नविन समितीचे कार्यकारीणीत दिसत नाही, जवळपास सर्वच नविन सदस्य एकाच समाजाचे असुन, हे चुकीचे आहे. त्यामुळे सदर समिती बरखास्त होऊन मराठा समाजासह सर्व समाजातील लोकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना करण्यात आलेची माहीती ॲॅड. अजित विघ्ने यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *