
करमाळ्या मध्ये होत असलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे बाबतीत राजकारण कोणीही करू नये : शिवभक्त
ता : करमाळा
छत्रपती चौक करमाळा येथे होत असलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बाबतीत कोणीही राजकारण आणू नये हा अश्वारूढ पुतळा सर्व शिवभक्तांच्या संकल्पनेतून करमाळा येथे उभा राहत आहे. यामध्ये सर्व शिवभक्तांचा सहभाग व सर्व बहुजन बांधवांचा सहभाग मोलाचा आहे .यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा प्रामुख्याने महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर , सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच ,करमाळा नगरपालिका अशा

अनेक ठिकाणाहून या अश्वरूढ पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य होत आहे .हे होत असताना काही विघ्न संतोषी लोक स्वतःच्या नावाने बातम्या देऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी याचा वापर करत आहे हे सर्वतोपरी चुकीचं आहे याचा निषेध सर्व बहुजन बांधव व शिवभक्तांमधून होत आहे कृपया याची नोंद विघ्न संतोषींनी घ्यावी ही विनंती अन्यथा शिवभक्त शांत बसणार नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा ,,,,,
जय जिजाऊ
जय शिवराय


