
श्री आदिनाथ महाराज संगोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
करमाळा :–गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोना च्या महामारीमुळे बंद असलेली करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी भरणारी श्री क्षेत्र आदिनाथ महाराज देवस्थान ची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .या यात्रेसाठी यात्रा कमिटी ने चांगल्या प्रकारे जागेची निवड केली होती ,त्याठिकाणी स्वछता करण्यात आली होती .पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली

होती .मिठाईचे, खेळणी ,पाळणे,रसवंती ची स्टॉल ने या यात्रेला शोभा अली होती .आपत्ती व्यवस्थापन समिती नेमली होती .त्यामुळे गाड्यांची पार्किंगची सोय, दर्शन रांग आदींच्या सूचना माईकवरून दिल्या जात होत्या . शनिवार व रविवार या दोन्हीही दिवशी मंदीरात गर्दी दिसत होती .भाविकांची दर्शन रांग सातत्याने चालूच होती व भाविक शांततेत दर्शन घेत होते .

या यात्रेसाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एपीआय जगताप,बिट चे शेख,घोरपडे,महसूल चे मंडल अधीकारी ठाकर,मंडल सजा चे तलाठी ज्यांनी आपल्या कामाचा दर्जा जोपासला आहे ते मयूर क्षीरसागर,ग्रामसेवक दरवडे,तलाठी काळे,सोमनाथ खराडे,रवी जाधव, ऍड शशिकांत नरुटे,सुनिल जाधव,सदस्य अनिल गायकवाड,संदीपन

गायकवाड, मारुती जाधव,बबन भालेराव,आदींनी अहोरात्र परिश्रम घेऊन ही यात्रा पार पडली .पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी यात्रा साठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .वरील सर्व शासकीय अधिकारी यांचे देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत .यात्रेमध्ये कसलाही अनुचित प्रकार घडला नाही .
