
हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीला जेऊर येथे थांबा मिळावा यासाठी मा आ जगताप यांचे रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी
हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीला जेऊर येथे थांबा मिळावा यासाठी मा आ जयवंतराव जगताप यांचे मध्य रेल्वे च्या व्यवस्थापकांना निवेदन … पुणे – सोलापूर दरम्यान करमाळा तालुक्यातील दौंड , पूणे , मुंबई कुर्डूवाडी , सोलापूर आदि शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील करमाळा तालुक्यातील ५० ६० गावे , इंदापूर , जामखेड , कर्जत , भूम , परंडा इ . तालुक्यातील हजारो प्रवाशांची वर्दळ असलेले अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा

एक्सप्रेस तथा इंटरसिटी रेल्वे गाडीला (गाडी क्रं . १२१५७ / ५८) तात्काळ थांबा मिळावा जेणे करून प्रवाशांना शासकिय कार्यालयीन कामकाजासाठी , व्यापाऱ्यांना खरेदी विक्री साठी , नागरिकांना दवाखान्यासाठी , कोर्ट कचेरीच्या कामांसाठी तसेच विद्यार्थ्यांना व चाकरमान्यांना ये-जा करण्यासाठी सोय होईल. तसेच आर्थिक उलाढाल वाढून रेल्वेचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल या करिता नागरिकांची गैरसोय थांबण्यास मदत होईल अशा मजकुराचे मा .आमदार जयवंतराव जगताप यांनी मध्य रेल्वे च्या व्यवस्थापकास निवेदनाद्वारे मागणी केली आहे .


