शिवजयंती निमित्त पंचशील स्पोर्टस अँन्ड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत
करमाळा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पंचशील स्पोर्टस अँन्ड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने सीतामाता मराठी मुलींची शाळा रंभापुरा करमाळा या शाळेत चटई व खाऊ वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे यश कल्याणी सामाजिक संस्थेचे गणेशजी करे पाटील, मुख्याधिकारी नगरपालिका करमाळा लोंढे साहेब, नगरसेवक पप्पू सावंत साहेब, शंभूराजे जगताप, शौकत नालबंद,

राजू आव्हाड भारिपचे जिल्हा उपाध्यक्ष व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष देवा अण्णा लोंढे, ज्योतीराम ढाणे, कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, वार्ताहार सिद्धार्थ वाघमारे, सुनील भोसले व गुरुजन उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई व खाऊ वाटप करण्यात आला तसेच अंगणवाडीसाठी छत्रपती शिवाजी महाराज

व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा फोटो भेट देण्यात आली तसेच पंचशील स्पोर्टस अँन्ड सोशल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव लोंढे, उपाध्यक्ष खालील भाई मुलांनी व सदस्य गणेश झाकणे यांचा सत्कार प्रमुख पाहुणेचे वतीने सत्कार करण्यात आला व प्रमुख पाहुणे व पत्रकार बंधूंचे सत्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फोटो भेट देण्यात आली व याप्रसंगी गुरुजी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *