जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आज शिवजयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत जेऊर व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जेऊर ग्रामपंचायतीच्या आवारात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासुनच जेऊर ग्रामपंचायतीच्या आवारात मंडप, रांगोळी, फुलांच्या माळा व भगवे ध्वज आदिसह परिसर सुभोषित

करण्यात आला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या सिंहासनावर आरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.यावेळी युवानेते पृथ्वीराज (भैय्या)पाटील, माजी सरपंच भास्कर (भाऊ) कांडेकर,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष राजूशेठ गादिया, माजी उपसरपंच राजभाऊ जगताप,धनंजय शिरसाठ,संचालक सुनील बादल, धनंजय शिरसकर राजभाऊ जाधव ग्रा प सदस्य हंबीरराव चव्हाण,शिवाजी वाघमोडे,डॉक्टर हजारे ग्रा प सदस्य मुबारक

फकीर, सरपंच भारत साळवे, उमेश कांडेकर, महेश कांडेकर,रामभाऊ जगताप,ग्रा प सदस्य संदिप कोठारी, हनुमंत वीटकर संतोष सुतार,कलसाईत भाऊसाहेब (ग्रामसेवक) मंडळ अधिकारी वळेकर,ग्रा प सदस्य संतोष वाघमोडे, महेंद्र जगताप, नाभिक सेनेचे नेते सोमनाथ काशीद तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी आयान फकीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले.
उपस्थितांचे आभार शिवजयंती जन्मोत्सव समिती प्रमुख भास्करराव कांडेकर यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *