
आता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे
महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेल्या शिवसेनेचे नाव व पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला मिळाले असून आता महाराष्ट्रात पूर्ण शिवसेना एक मुखी करण्यासाठी उद्धव
ठाकरे यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली काम करावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे

आज धनुष्यबाण शिवसेना नाव मिळाल्यानंतर करमाळा येथील शिवसैनिकांनी फटाक्याच्या आकाशबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा केला
तालुकाप्रमुख देवानंद बागल व शहर प्रमुख नागेश गुरव व सेनेचे निखिल चांदगुडे विशाल गायकवाड महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड पैलवान दादा इंदुलकर शिवसेना वैद्यकीय पक्ष सहप्रमुख शिवकुमार चिवटे हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर शेंडगे रोहित वायबसे
आधी जण उपस्थित होते

या जल्लोषानंतर झालेल्या सभेत बोलताना महेश चिवटे म्हणाले
बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गातून नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आशीर्वाद दिला आहे
खऱ्या अर्थाने हिंदुरुदय समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लागत असेल

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवाराच्या दावणीला बांधून सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लाचार कार्यकर्ते होण्याची वेळ आली होती मात्र स्वाभिमानी एकनाथ शिंदे यांनी उठाव करून राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसची या माध्यमातून जिरवली आहे
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करून तमाम शिवसैनिकांच्या हितासाठी व हिंदूंच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून आगामी काळात राजकारण समाजकारण करावे असे आवाहन केले