
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहलीचा लुटला मनमुराद आनंद
करमाळा – येथील विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या कोकण दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यात वाई , पाचगणी , महाबळेश्वर , प्रतापगड , महाड , रायगड व श्रीवर्धन इत्यादी ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.

सदर सहलीतून विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड, ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती , संबंधित परिसरातील लोकजीवन व पर्यटन स्थळाबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. यात 195 विद्यार्थी 25 शिक्षक सहभागी झाले होते. या सहलीतील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसं डून वहात होता. सदर सहलीची प्रतिक्रिया व्यक्त करताना कु. आरणे ऐश्वर्या व कु. नाळे साक्षी या विद्यार्थीनींनी आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय सहल संपन्न झाली. या सहलीचे नियोजन चांगले झाल्यामुळे, प्रवास , भोजन ,निवास व्यवस्था अत्यंत उत्तम असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच

महाबळेश्वर येथील हिरवीगार वनश्री व अल्हाददायक हवामानाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण रायगड व प्रतापगड पाहून विद्यार्थ्यांच्या इतिहासाला उजाळा मिळाला. कोकणातील अरबी समुद्राच्या श्रीवर्धन येथील स्वच्छ व सुंदर बीचवर पोहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला .
सदर सहल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख , सहल विभागाचे प्रमुख प्रा. मनोहर धिंदळे व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

