
करमाळा प्रतिनिधी – श्री मकाई सहकारी साखर कारखाना संदर्भात आप्पासाहेब झांजुर्णे यांनी केलेले वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचे व तथ्यहीन आहे असे कारखान्याचे चेअरमन श्री दिनेश भांडवलकर यांनी सांगितले वास्तविक पाहता वस्तुतिथी अशी आहे की त्यांनी सांगितले की एनसीडीसी श्री मकाई सहकारी साखर कारखाना ताब्यात घेणार आहे परंतु त्यांना मला सांगावे वाटते कि एनसीडी सी चा पहिला हप्ता एप्रिल 2027 नंतर येणार आहे तो भरला नाही तर त्या नंतर 3 महिन्या नि ते अकाउंट एनपीए मध्ये जातं आणि त्यानंतर लीगल प्रोसेस करून नोटीस देऊन कारवाई होते, ते प्रोसेस ला कमीत कमी किती वर्ष लावतील हे सांगता येत नाही आणि तशी वेळ येणार पण नाही कारण आम्ही नियमित हफ्ते भरणार आहोत.. पण अपुऱ्या माहिती च्या आधारे एनसीडी सी कारखाना ताब्यात घेणार असे वक्तव्य करणे खोडसाळ पणा चे आहे,एन सी डी सी कडून मकाई कारखान्याला लोन मिळालेलं एक वर्ष झालेला आहे तोपर्यंत एनसीडीसी कारखाना ताब्यात कसा घेणार हे साखर धंद्यातील जानकराला देखील पडलेले एक प्रकारचं कोड आहे आणि अशा माणसांच्या तोंडातून असं वक्तव्य येणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे आणि त्यांनी दुसरा आरोप असा केला की मग काही कारखान्याचा संचालक मंडळ हे कारखान्याचे मशनरी विकत आहे याबाबत मी सविस्तर स्पष्टीकरण देतो की श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या स्क्रॅप यार्ड मधील स्क्रॅप मटेरियल माननीय संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मान्यता घेऊन स्क्रॅप विक्री काढलेला आहे.त्याचबरोबर कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरात पाच ते सहा फूट पावसाळ्यातल्या वाढलेल्या गवतात वर्षानुवर्षे पडून राहिलेले स्क्रॅप हे टाकळी येथील श्री काकडे यांच्या जेसीबी ने बाहेर काढलेला आहे आणि ते स्क्रॅप विक्री केलेला असून सबंधीताकडून माहिती घेऊ शकता. आणि 15 कि 16 ट्रक गेल्या ते सी सी टीव्ही मध्ये बघू शकता. सर्व सत्यता समजून येईन तालुक्यात काही लोकांना काम नाही आणि तालुक्यातील ठप्प असलेल्या विकास कामाबाबत लक्ष दुसरीकडे वळवण्याठी बेताल आरोप करण्याचा सपाटा चालू आहे,त्याचबरोबर कारखान्याच्या फॅक्टरी बिल्डिंगमध्ये एकूण 35 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याबाबत कोणाला काही शंका असल्यास एक महिन्यापासूनच सीसीटीव्ही फुटेज सभासदांनी मकाई कारखान्यावर येऊन पाहावे जर मशनरी विकलेला आढळून आल्यास आम्ही तुम्ही सांगाल ते शिक्षा भोगायला तयार आहे. कारण लोकनेते स्वर्गीय दिगंबर रावजी बागल मामा यांनी कष्टातून उभा केलेल्या मकाई कारखाना शेतकऱ्यांसाठीच मंदिर आहे त्यामध्ये असे घाणेरडे प्रकार आम्ही कदापि करणार नाही.अशा विचित्र प्रवृत्तीने बेचुट आरोप करणाऱ्या व्यक्ती विरोधात आपण अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि त्यांना माझी विनंती आहे की कृपया सभासदांमध्ये संभ्रम व राज्यामध्ये श्री मकाई सहकारी साखर कारखान्याला बदनाम करण्याचा खोटा प्रयत्न कोणीही करू नये अन्यथा सभासद त्यांना चोख प्रत्युत्तर देतील.