भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभागाच्या सोलापूर जिल्हा सह संयोजक पदी अमरजीत साळुंखे यांची निवड

करमाळा: भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग, सोलापूर जिल्हा(ग्रा) व सोलापूर शहर ची बैठक शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सोलापूर शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुकतीपत्राचे वाटप करण्यात आले. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘भाजपा पंचायत राज व ग्रामीण विकास विभागाचे’ महाराष्ट्र प्रदेश

संयोजक श्री. गणेश काका जगताप उपस्थित होते, त्यांच्या शुभ हस्ते करमाळा तालुका भाजपा सरचिटणीस अमरजित साळुंके यांना भाजपाच्या सोलापूर जिल्हा सहसंयोजक पदी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी इतरही नेमणुका करण्यात आल्या.यावेळी श्री जगताप यांनी भाजपा पंचायत राज व ग्रामविकास या विभागाची काम करण्याची पद्धत, उद्देश व याची अंमलबजावणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रदेश स्तरावर चालू असलेल्या ‘धन्यवाद मोदीजी’ या अभियानाचे

सोलापूर जिल्ह्याला पन्नास हजार पत्र तयार करण्याचे टारगेट दिले. ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या अभियाना संदर्भात त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. याबरोबरच पंचायतराज चे प्रदेश सहसंयोजक श्री.राजीव शर्मा, प्रदेश सहसंयोजक श्री.अंकुश देशमुख तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय सहसंयोजक श्री.समाधान गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशचे सहसंयोजक श्री. राजीवजी शर्मासाहेब यांनी संघटनेचे महत्त्व व रचना तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.या बैठकीचे परिपूर्ण असे नियोजन सोलापूर जिल्हा संयोजक श्री.दत्तात्रय मोरे व सोलापूर शहर संयोजक श्री.अनिल कंदलगी व सहाऱ्यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *