गोयेगाव प्रतिनिधी

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गोयेगाव येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

हे रक्तदान शिबिर कमलादेवी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून मंडळाने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली.

यावेळी रियाज शेख, अमोल आटोळे, मनोज माळशिकारे, स्वप्नील वायसे, सत्यम पवार, आशोक माळशिकारे, तुषार आटोळे यांच्यासह श्री गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *