करमाळा प्रतिनिधी

मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतीपंपांना पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय लोकरे यांना निवेदन देण्यात आले.

सध्या पावसामुळे शेतीपंपांना वेळेत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मांगी तलावाच्या लाभक्षेत्रात ऊस, केळी, कांदा तसेच जनावरांसाठी चारा आणि इतर पिके मोठ्या प्रमाणात उभी आहेत. अशा परिस्थितीत महावितरणच्या माध्यमातून कोणतीही पूर्वकल्पना न देता वीजपुरवठ्यात कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

वीजपुरवठा पूर्ववत करून शेतीपंपांना पूर्वीप्रमाणे आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास मांगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, संदीप काळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, विकास गायकवाड, दिनेश भांडवलकर, सुजित तात्या बागल, रघुनाथ काळे, गणी पठाण, शिवशंकर जगदाळे, राजाभाऊ बागल, अजय बागल, भोजराज सुरवसे, ईश्वर भांडवलकर, विलास बर्डे, गोवर्धन करगळ, नानासाहेब नलवडे, गणेश गायकवाड, हनुमंत काळे, गहिनीनाथ रोडगे, संपत बागल, इमाम पठाण, काका गायकवाड, अनिल धुमाळ, हेमंत जाधव, पप्पू भिसे, आजिनाथ सुरवसे, गणेश ईवरे, अंगद भांडवलकर, गणेश कामटे, हरी काळे यांच्यासह मांगी तलाव परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *