करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील खेळाडू देवराज सतिश कन्हेरे इयत्ता – 7 वी क याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. या खेळाडूला सचिन बलभिम दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रशालेच्या वतीने संस्थेचे चेअरमन मा.आ. जयवंतराव जगताप, मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप संस्थेचे प्राचार्य अनिस बागवान सर, पर्यवेक्षक महेश कांबळे सर, पर्यवेक्षीका नवले मॅडम, सायन्स विभाग प्रमुख विजयकुमार पवार सर, संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व आभार प्रदर्शन पुजारी सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *