करमाळा प्रतिनिधी  

ग्रामपंचायत पांडे अंतर्गत धायखिंडी येथे जलतारा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या सीसीटी कामाची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षलागवड करण्यात आली.

या कार्यक्रमास करमाळा डीवायएसपी अंजना कृष्णा, करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. राख सर, ग्रामपंचायत अधिकारी टी. आर. पाटील, पांडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनिता बाळासाहेब मोटे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे, ॲड. अमर शिंगाडे, पोलीस पाटील तुकाराम मोटे, मुख्याध्यापिका सोरटे मॅडम, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक, विद्यार्थिनी, स्वराज्य अकॅडमीचे विद्यार्थी व गिरवले सर, गावातील महिला, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *