
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वाची भर पडत असून, येथील जाधव-पाटील हॉस्पिटल व जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबच्या वतीने ‘कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील आय.सी.यु. ॲण्ड कॅथलॅब (सी.सी.यु.)’ मधील अत्याधुनिक कॅथलॅब सुविधेचा भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
जाधव-पाटील हॉस्पिटल येथे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भगवानराव गोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद करमाळाचे माजी आमदार संजयमामा शिंदे भूषवणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळाचे आमदार नारायण (आबा) पाटील, माजी आमदार जयवंतराव (भाऊ) जगताप, माजी आमदार राहुल (भैया) मोटे, भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी (दिदी) बागल-कोलते, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मोहिनी (ताई) सावंत, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, केटीएमपी अध्यक्ष डॉ. नागनाथ लोकरे आणि केएमजी अध्यक्ष डॉ. संतोष आटोळे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रोहन प्रदीपकुमार पाटील, डॉ. स्वप्नील माळी, डॉ. शिवानी पाटील, डॉ. रोहन हेगडे, संतोषकुमार जाधव-पाटील, अभिजीत जाधव-पाटील, अजिंक्य जाधव-पाटील यांच्यासह जिजाऊ पॅथॉलॉजिकल लॅब, पाटील मेडिकल आणि आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच करमाळा तालुका प्रॅक्टीशनर असोसिएशन आणि मेडीकोज गिल्ड असोसिएशनचे सर्व सभासद या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.