करमाळा प्रतिनिधी

अकलूज येथील पाटीदार भवन येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण व संघटनात्मक वातावरणात संपन्न झाली.

बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा संकल्प अभियान तसेच मन की बात, सदस्य नोंदणी, पदवीधर मतदार नोंदणी,  SIR तसेच आगामी पक्षाच्या कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तळागाळापर्यंत पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, पश्चिम महाराष्ट्र प्रकोष्ठचे संयोजक मकरंदभाऊ देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आहे.

यावेळी रणजीत (भैय्या) शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मीदिदी बागल, श्रीकांतदादा देशमुख, राजकुमारनाना पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, प्रणव मालक परिचारक, जेष्ठ नेते प्रकाशबापू पाटील, बाबाराजे देशमुख, बी. वाय. राऊत, हनुमंतराव सूळ, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरजाताई बोबडे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने-पाटील, दत्ता जाधव, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, नगराध्यक्ष व नगरसेवक आणि पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटन अधिक सक्षम करण्याचा, प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची ताकद पोहोचविण्याचा आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *