
ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून जागतिक क्षितिज गाठावे : डॉ. गणेश करे-पाटील
लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर स्मृतिप्रीत्यर्थ करमाळा तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
करमाळा : ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाच्या बळावर जागतिक स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण करावे. इंग्रजी ही केवळ एक भाषा नसून उच्च शिक्षण, संशोधन, रोजगार आणि व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी गुरुकिल्ली आहे. वक्तृत्व स्पर्धांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, चिकित्सक विचारशक्ती आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित होते, असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील यांनी केले.
यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर आणि सोलापूर इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करमाळा तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा–२०२६ यशकल्याणी सेवाभवन, करमाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. करे-पाटील बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. नितीन कदम, चित्रपट निर्माते श्री. मंगेश बदर, सोलापूर इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, युवा उद्योजक श्री. निखिल चांदगुडे, विस्तार अधिकारी श्री. मिनीनाथ टकले, प्रा. भीष्माचार्य चांदणे तसेच पंचायत समितीचे विषय समन्वयक श्री. रेवणनाथ आदलिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मनोगत व्यक्त करताना चित्रपट निर्माते श्री. मंगेश बदर यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट प्रदर्शित होत असताना इंग्रजी भाषेचे अपुरे ज्ञान असल्यामुळे संवाद साधताना अनेक अडचणी आल्या, काही महत्त्वाच्या संधी गमवाव्या लागल्या आणि अपयशाचाही सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांतून इंग्रजीवर प्रभुत्व मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि यशाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती न बाळगता ती आत्मसात करावी, कारण आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिक युगात इंग्रजी ही संधींची भाषा आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
विस्तार अधिकारी श्री. मिनीनाथ टकले यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण वाचन, नियमित इंग्रजी संभाषण आणि विविध स्पर्धांमधील सहभागातून भाषेवरील प्रभुत्व विकसित करण्याचे आवाहन केले. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी इंग्रजी वक्तृत्वाचे सादरीकरण केले.
स्पर्धेतील विजेते
इयत्ता पाचवी–सहावी गट : प्रथम – अन्वी संजय गर्जे (जि. प. शाळा, करंजे), द्वितीय – नीरज प्रदीप सागडे (जि. प. शाळा, खंडागळे वस्ती), तृतीय – विराज नवनाथ साळवे (छ. शिवाजी हायस्कूल, कोर्टी). उत्तेजनार्थ – श्रेया सोमनाथ गुंड (न्यू इरा पब्लिक स्कूल, चिखलठाण), आर्यन अतुल राखुंडे (कर्मवीर जगताप विद्यालय, करमाळा), कार्तिकी सचिन झोळ (शरदचंद्र पवार विद्यालय, वाशिंबे).
इयत्ता सातवी–आठवी गट : प्रथम – मृणाल महावीर गोरे (त्रिमूर्ती विद्यालय, टाकळी), द्वितीय – आर्या उदय बंडगर (कन्या विद्यालय, करमाळा), तृतीय – स्वराली प्रदीप दळवी (कर्मवीर अ. जगताप विद्यालय, करमाळा). उत्तेजनार्थ – शुभनित मुकुंद साळुंखे (महात्मा गांधी विद्यालय, करमाळा), हदया बागवान (कन्या विद्यालय, करमाळा), सत्यम संतोष शिंगटे (कर्मवीर अ. जगताप विद्यालय, करमाळा).
इयत्ता नववी–दहावी गट : प्रथम – अक्षरा दादासाहेब घाडगे (लालबहादूर शास्त्री विद्यालय, सालसे), द्वितीय – वैभव अरुण कोकरे (त्रिमूर्ती विद्यालय, टाकळी), तृतीय – वैष्णवी दिगंबर पवार (वामनराव बदे विद्यालय, उमरड). उत्तेजनार्थ – सानवी अतुल पोळ (कर्मवीर अ. जगताप विद्यालय, करमाळा), योगिता विकास पवार (वामनराव बदे विद्यालय, उमरड), सृष्टी दत्तात्रय जाधव (कर्मवीर अ. जगताप विद्यालय, करमाळा).
प्रास्ताविक कल्याणराव साळुंके यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले. मारुती जाधव यांनी आभार मानले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गिरधरदास देवी विद्यालयाचे संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक संभाजी जगताप, करमाळा तालुका इंग्लिश असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके, सुखदेव गिलबिले, प्रा. जयेश पवार, शरद शिंदे, गोपाळराव तकीक, सहसचिव मारुती जाधव, विजय वणवे, सुहास गलांडे, बापू गायकवाड, शंकर दिरगुळे, आबासाहेब कारंडे, दत्तात्रय मोहोळकर, हरिश्चंद्र जाधव, विशाल राठोड तसेच तालुक्यातील सर्व इंग्रजी विषय शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.