
करमाळा प्रतिनिधी
मा. नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. ते तालुक्यात राम रहीम सारखे काम करीत आहेत असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.

इंदौर येथुन आलेल्या अहील्यादेवी होळकर दिंडी करमाळयातील मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, मा. नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांच्या येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जेवण व राहण्याची सोय दरवर्षी तांबोळी परिवार करीत आहेत. त्यावेळी मा. आ. जगताप बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रवीण कटारिया, आदीनाथ साखर कारखान्याचे मा. चेअरमन संतोष जाधव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अमिर तांबोळी, दिंडीचे महाराज, मूस्लिम समाज अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

