करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या गळीत हंगामासाठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम भिलारवाडी येथील प्रगतशिल बागायतदार लक्ष्मण अंबोधरे, कारखान्याच्या मार्गदर्शिका रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल, कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांचे हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तत्पूर्वी करमाळा तालुक्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते, श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिगंबररावजी बागल मामा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री उत्तम पांढरे, रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे, संतोष पाटील, रेवन्नाथ निकत, दिनकर सरडे, सतिश नीळ, युवराज रोकडे, सचिन पिसाळ, नवनाथ बागल, गणेश झोळ, बापू चोरमले, हंसराज पाटील, विलास काटे, अनिल शिंदे, महेश तळेकर, राजेंद्र मोहोळकर, विष्णू माने, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद व कारखान्याचे हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

गळीत हंगाम २०२६-२७ सुरू करण्याच्या दृष्टीने मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे युध्दपातळीवर सुरू करण्यात येत असुन ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करण्याचे काम सुरू करण्याच्या सुचना संचालक मंडळाने संबंधीतास दिलेल्या आहेत. मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे तातडीने पूर्ण करून सक्षम ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कामावर घेवून यावर्षिचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून या गळीत हंगामात ४.०० लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने यावेळी व्यक्त केला.

आपल्या कारखान्याचे यावर्षी गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या मकाई साखर कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी यावेळी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *