करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील कुंभेज या गावात स्मशानभूमी नाही या संदर्भात तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

कुंभेज येथील गायरान यामध्ये गट नंबर 23 मधील स्मशानभूमीतील 21 गुंठे जागा आहे ती जागा वन विभागाकडून ग्रामपंचायतकडे वर्ग / हस्तांतरित करण्याचे आदेश मिळावेत. स्वातंत्र्य काळापासून कुंभेज गावाला स्मशानभूमीच नाही. समशानभूमीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांनी वारंवार वन विभागाकडे पुराव्यानिशी कागदपत्रे सादर केलेले आहेत. करमाळा तहसील कार्यालयाशी पत्र व्यवहारही केलेला आहे. तरी आम्हाला कोणीही दाद देत नाही. असे पत्र वनमंत्री गणेश नाईक यांना देण्यात आले होते. व त्या पत्रात असे लिहिले होते की, आपणाकडून यावर विचार करून आम्हाला न्याय मिळावा. दिलेल्या अर्जानुसार 21 दिवसांनी म्हणजेच २४ जून ला सर्वजण आमरण उपोषणास बसणार असेही सांगण्यात आले होते. परंतु याचाही काही फायदा झाला नाही. यामुळे ग्रामस्थांनी आज दिनांक 24 जून रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.

कुंभेज गावाला स्मशानभूमी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, स्मशानभूमीसाठी जागा मिळावी आमची हीच मागणी पूर्ण व्हावी, नागरिकांच्या हक्काची स्मशानभूमी त्वरित द्या त्वरित द्या, स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा प्रशासन जागे व्हा, प्रशासनाचा कारभारणी व स्मशानभूमीसाठी का असा निम्म ?, आमच्या भावनांचे खेळू नका स्मशानभूमीसाठी जागा द्या, जगताना हक्क दिला नाही मेल्यावर स्मशानही देणार नाही का ?, सन्मानाने जगण्याचा हक्क आमचा स्मशान भूमीचा अधिकार आमचा, उमेद करांचा एकच नारा स्मशानभूमीचा प्रश्न सोडवा अशाप्रकारे नारे देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, पैगंबर पठाण, शामराव खरात, अक्षय पवळ, तानाजी चांदणे, उदयसिंह देशमुख. महावीर साळुंखे आदिजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *