
करमाळा प्रतिनिधी
चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करमाळा शहरातील सरकारी जागेवरील अतिक्रमण झोपडपट्टी नियमित करा अशी मागणी देवा (अण्णा) लोंढे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.
करमाळा शहरातील सन १९८० सालापासून करमाळा शहरातील नगरपालिका हद्दीमध्ये गरजवंत बेघर लोकांनी अतिक्रमण करून झोपडपट्टी बांधून राहत आहे. आज जवळजवळ 40 वर्ष झालेले आहेत. या झोपडपट्टीतील लोकांची मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट आहे तसेच नगरपालिकेचे नळ जोडणे, महाराष्ट्र राज्य विद्युत जोडणी त्यांनी घेतलेली आहे. करमाळा

शहरातील सुमन नगर झोपडपट्टी, सिद्धार्थ नगर झोपडपट्टी, संभाजीनगर झोपडपट्टी, फंड गल्ली, स्वांमिल शेजारी झोपडपट्टी, चांदगुड गल्ली झोपडपट्टी, जामखेड रोड झोपडपट्टी, मोहल्ला गल्ली झोपडपट्टी, यल्लमा मंदिर झोपडपट्टी, रंभापुरा झोपडपट्टी, मौलाली नगर झोपडपट्टी व इतर लहान लहान झोपडपट्ट्यामध्ये सर्व जाती-धर्माचे बेघर गरजवंत लोक झोपडपट्टी बांधून राहत आहेत. त्या झोपडपट्ट्यांना बरेच वर्ष झाले असल्याकारणाने त्या झोपडपट्ट्या राहणे योग्य राहिल्या नाहीत. येत्या

पावसाळ्यामध्ये झोपड्या पडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्रमांक ०८१०/प्र क्र ९६/२०१८ झोपसु_१ मंत्रालय मुंबई दि १६/मे/२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व झोपडपट्टी धारकांना महाराष्ट्र शासन झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन आधी नियम 1971 मधील तरंदूतीनुसार सर्व झोपडपट्टी धारकांना आहे त्या ठिकाणीची जागा त्यांच्या नावावर करून सिटी सर्वे मध्ये नाव नोंद करण्यात यावे व त्या जागेवर नगरपालिकेमार्फत

घरकुल मंजूर करून झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन करण्यात यावे. जर नगरपालिकेमार्फत झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन संदर्भातील कामकाज दिनांक 12/5/2026 पर्यंत सुरू करण्यात आले नाही तर दिनांक 13/5/2026 पासून नगरपालिकेसमोर चक्री उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक संदीप कांबळे, भीम टोला ग्रुपचे जितेश कांबळे व रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष प्रवीण मोहोळ यांनी प्रशासनास दिला.
