
मलिक साहेब उरूस उत्साहात साजरा करण्यात आला.
पांडे ता करमाळा येथे हिदू मुस्लिम एकात्मिक प्रतीक असलेल्या मलिक साहेब संदल उरूस या वर्षी ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दिवसभर हिंदू मुस्लिम बांधवांनी फुलांची चादर अर्पण करीत होते.
संध्याकाळी पाच वाजता प्रकाश जगताप व सुनिलाल मुजावर यांच्या हस्ते संदल घोड्याला फुलांची चादर अर्पण करून मिरवणूकला सुरुवात करण्यात आली. साई बॅन्जो, हालकी पथका सह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
मिरवणूक वेळी गावात संत सावता माळी सप्ताह निमित्त प्रवचन चालू होते. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी सदल मिरवणूक वाद्य बंद करुन मिरवणूक पुढे जात असताना बापू दुधे महाराज यांनी ही प्रवचन बंद करून हिंदू बांधवांनी व महीला नी संदल घोड्या चे दर्शन घेतले. हिंदू मुस्लिम एकात्मिक प्रतीका व हिंदू मुस्लिम चा एक आदर्श पहावयास मिळाला.
परंपरा पासून मनोभावा ने पुजा केल्यास नवसाला पावणारा मलिक साहेब पिर आहे मनातील ईच्छा निश्चित पूर्ण करतो अशी ख्याती आहे लोकांना याचा अनुभव पहावयास मिळत आहे.आसे शब्बीर मुजावर यांनी सांगितले.
उरूस कमेटी च्या वतीने माजी सरपंच तुकाराम शिरसागर, माजी ग्रामपंचायत सदस्य मारूती भोसले, बाबु कोल्हे, महादेव भोसले यांच्या सत्कार अकबर मुजावर व पत्रकार दस्तगीर मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला. उरूस निमित्त गावातील बरडे, कांबळे, भोसले, पिरा च्या मंदिर येथे फुलांची चादर अर्पण केली. मिरवणूकीत हिरवे झेंडे ,पांढरा शुभ्र घोडा हे आकर्षण होते.
कुराण पठण अकबर मुलाणी व ईसाक मुलाणी यांनी केले. देशात सुख शांती लाभो तसेच मोठा पाऊस पडावा म्हणून सामुदायिक प्रार्थना केली.
म़ंदीर परीसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी जमाल मुजावर, अकबर मुजावर, सुनिलाल मुजावर, शब्बीर मुजावर, प्रमोद लांडगे, हुसेन पठाण, फाय्याज मुजावर, अम�
