करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करमाळा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले असता करमाळा तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यावेळी करमाळा तालुक्यातील मुस्लीम समाजातील ग्रामीण भागातील अनेक खेड्यात दफनासाठीही दफनभूमीची जागा (कब्रस्तान) नाही त्यामुळे अंत्यविधी करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. काही प्रसंगी गावात वाद विवाद

सुद्धा होतात. मेलेल्या व्यक्तीची हेळसांड होत आहे. मेल्यानंतर तरी सुखाने अंत्यसंस्कार व्हावे. अनेक कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्या गावात दफनासाठीही जागा नसल्यामुळे अनेक किलोमीटरचा प्रवास करून प्रेत हे करमाळा शहरातील कब्रस्तानात आणावे लागत आहे. या प्रसंगी लोकांबरोबर मेलेल्या व्यक्तीचीही हेळसांड होत आहे. मेल्यावर सुखाने अंत्यविधी होत नाही या करिता अनेक वर्षांपासून करमाळा तालुक्यातील मुस्लीम समाजातील दफनविधीचा प्रश्न जागेच्या अभावी गंभीर बनला आहे. या करिता सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, करमाळा तालुक्यातील ज्या गावात दफनासाठीही दफनभूमीची जागा नाही त्या ठिकाणी दहा ते वीस गुंठे जमीन कब्रस्तानात करिता देण्यात यावी. यावेळी निवेदन देताना बावनकुळे यांनी सांगितले की, आम्ही आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार करु व तात्काळ मुस्लीम समाजातील प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी करमाळा तालुक्याचे तहसीलदार मॅडम शिल्पा ठोकडे व सोलापूर जिल्हाचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना सूचना दिल्या आहेत.

यावेळी सकल मुस्लीम समाजचे मार्गदर्शक तालुकाध्यक्ष कलीम काझी सर, शहर अध्यक्ष जमीर सय्यद, मार्गदर्शक व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे संस्थापक समीर शेख, रोहित पवार फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण, रहनुमा ट्रस्टचे सचिव सुरज शेख,  सकल मुस्लीम समाजचे मार्गदर्शक उपाध्यक्ष जहांगीर बेग, मुस्लीम समाजाचे उपाध्यक्ष वाजीद शेख, अब्दुल कलाम फाऊंडेशनचे सचिव रमजान बेग, करमाळा माहिती अधिकारचे तालुकाध्यक्ष आझाद शेख, फिरोज मेंबर,  उर्दू शाळाचे शालेय समितीचे उपाध्यक्ष इकबाल शेख, युवा नेते दिशान कबीर,  युवा नेते अरबाज बेग, युवा नेते सोहेल पठाण, शाहीद बेग, कलीम शेख, अलीम शेख, इमित्याज पठाण, चांद बेग, आम्मो मदारी, दाऊद मदारी, कय्युम मदारी, अक्रम मदारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *