करमाळा प्रतिनिधी  

कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या १ मे रोजी असलेल्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.

दि. 1 मे 2026  रोजी आपण कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करीत आहोत. अगदी योगायोग म्हणजे या कामगार दिनी कामगार नेते, हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषद माजी सदस्य, श्री आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांची 75 वी जयंती आहे.

कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पुष्पांजली अर्पण सोहळा शुक्रवार दि, 1 मे 2026 रोजी हमाल भवन,  मार्केट यार्ड,  पोथरे नाका,  करमाळा येथे सकाळी 9.00 वा. आयोजित केले आहे.

यानंतर मोफत आरोग्य शिबीर (शुगर, बीपी, ईसीजी, औषधे, डोळे तपासणी आणि चष्मा वाटप वगैरे तपासणी) चारा वाटप व फळे वाटप कार्यक्रम सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे, अशी विनंती हमाल पंचायत करमाळा व स्व. सुभाष (आण्णा) सावंत जयंती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *