
करमाळा प्रतिनिधी
दहिगावच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक जमादार, मा. आ. संजयमामा शिंदे यांचे पीए विकास वीर तसेच पांडे,म्हसेवाडी,सौंदे, शेवगाव क,फिसरे,हिसरे,अर्जुनगर आदी गावांतील शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दहिगाव उपसा सिंचनचे अधिकारी यांनी दोन दिवसांत पाण्याचे नियोजन केले जाईल असे लेखी स्वरूपात लिहून दिल्यानंतर आंदोलन संपविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बिभीषण जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता



